वैष्णवीला न्याय मिळवून देणार   

मुख्यमंत्री फडणवीस यांची कस्पटे कुटुंबीयांना ग्वाही

मुंबई,  (प्रतिनिधी) : वैष्णवी हगवणे-कस्पटे हिला न्याय मिळवून देण्यासाठी राज्य सरकार सर्वतोपरी प्रयत्न करेल. तसेच, या प्रकरणातील दोषींवर कठोर कारवाई केली जाईल, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी कस्पटे कुटुंबीयांना आश्वस्त केले. मुख्यमंत्री फडणवीस यांनी शनिवारी वैष्णवीचे वडील अनिल कस्पटे यांच्याशी व्हिडिओ कॉलद्वारे संवाद साधून त्यांच्या दुःखात सहभागी होत सहवेदना व्यक्त केल्या आणि सांत्वन केले.
 
वैष्णवीच्या दुर्देवी मृत्यूनंतर राज्यभरात संतापाची लाट उसळली आहे. यावरून विरोधकांनी सरकारवर टीकाही सुरू केली आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री फडणवीस यांनी वैष्णवीचे वडील अनिल कस्पटे यांच्याशी व्हिडिओ कॉलद्वारे संवाद साधला. मंत्री गिरीश महाजन हे कस्पटे यांच्या निवासस्थानी हजर होते. त्यांनी हा संवाद करवून दिला. 
 
वैष्णवीला न्याय मिळवून देण्यासाठी राज्य सरकार सर्वतोपरी प्रयत्न करेल तसेच, या हृदयद्रावक प्रकरणातील दोषींवर कठोर कारवाई केली जाईल, असे फडणवीस यांनी आश्वस्त केले. या कठीण काळात संपूर्ण प्रशासन आणि राज्य सरकार कस्पटे कुटुंबीयांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे, असा विश्वासही फडणवीस यांनी व्यक्त केला.

Related Articles